PDCC Bank Bharti 2025 ; पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 पदांची मोठी भरती

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे (PDCC Bank) यांनी 2025 साठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. बँकेमध्ये लेखनिक (Clerk) पदांवर सरळसेवा भरतीद्वारे एकूण 434 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. बँक क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती विभाग :
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये कार्यरत असलेल्या या सहकारी बँकेत चांगल्या संधी, स्थिर नोकरी आणि उत्तम पगारामुळे मोठ्या प्रमाणात लोक आकर्षित होतात.
एकूण पदे :
या भरती मध्ये एकूण तब्बल 0434 जागा भरल्या जात आहेत.
शैक्षणिक पात्रता :
लेखनिक पदासाठी खालील पात्रता आवश्यक आहे:
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
पदाचे नाव :
भरतीच्या पदाचे नाव लेखनिक (Clerk) आहे. हे पद बँकेच्या दैनंदिन बँकिंग व्यवहार, ग्राहक सेवा, व्यवहार नोंदणी, पैसे in out आणि कार्यालयीन कर्तव्ये सांभाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
वयोमर्यादा :
उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 38 वर्षांच्या मध्ये असावे.
अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन असेल.
Punjab Bank Bharti 2025 जाहीर! तुमची निवड होऊ शकते या टिप्सने.
PDCC Bank Bharti 2025 नोकरी ठिकाण :
नोकरी ठिकाण पुणे आहे. पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणारे उमेदवार 70% पदे राखीव आहेत व उर्वरीत 30% पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरीता आहेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :
20 डिसेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
PDCC Bank Bharti 2025 ही पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी उत्तम आणि स्थिर सरकारी सहकारी बँक नोकरीची मोठी संधी आहे. 434 जागांची मोठी भरती असल्याने उमेदवारांनी पात्रता तपासून त्वरित अर्ज करावा. संगणक कौशल्य, पदवी आणि वयोमर्यादा लक्षात घेऊन योग्य उमेदवारांना निवड प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी दिली जाईल. बँक क्षेत्रात उज्वल करिअर घडवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे




