Taaze Update

Latest marathi news

Bank of India Bharti
जॉब एज्युकेशन

Bank of India Bharti 2025 ; बँक ऑफ इंडिया मध्ये 115 जागांसाठी भरती सुरू

Bank of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडिया मध्ये 115 जागांसाठी भरती सुरू

Bank of India Bharti

Bank of India Bharti ही एक बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी! बँक ऑफ इंडिया (Bank of India) या भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने 2025 साठी नवीन भरती जाहीर केली आहे. मुंबई येथे मुख्यालय असलेल्या या नामांकित बँकेद्वारे एकूण 115 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे. कायमस्वरूपी नोकरी, आकर्षक वेतनमान आणि देशातील कुठेही नियुक्ती मिळू शकते. त्यामुळे ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचे आहे, त्यांनी ही माहिती नक्की वाचावी.

• भरतीचे तपशील Bank of India bharati 2025 Details

• भरती संस्था :बँक ऑफ इंडिया (Bank of India)

• एकूण पदे : 115

• नोकरी प्रकार : सरकारी / कायमस्वरूपी

• अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

• नोकरी ठिकाण : भारतभर

• शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025

• पदांची नावे व आवश्यक पात्रता :

या भरतीमध्ये विविध तांत्रिक व कायदे विषयक पदांचा समावेश आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव खालीलप्रमाणे:

1) मुख्य व्यवस्थापक

बी.ई./बी.टेक./एमसीए/एम.एससी./बी.एससी.

संबंधित विषयात किमान 60% गुण

संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक

2) वरिष्ठ व्यवस्थापक

बी.ई./बी.टेक./बी.एससी. किंवा एमसीए/एम.एससी./एम.टेक.

किमान 60% गुण

काही पदांसाठी अनुभव आवश्यक

3) कायदा अधिकारी (Law Officer)

कायद्यात पदवी (3 वर्षे/5 वर्षे)

संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक

4) व्यवस्थापक (Manager)

बी.ई./बी.टेक./बी.एससी. किंवा एमसीए/एम.एससी./एम.टेक.

किंवा सीए/ICWA/एमबीए (Finance)

60% गुण + अनुभव

• मासिक वेतन :

सुमारे ₹64,820/- पासून पुढे याशिवाय बँकेतील इतर सुविधा, भत्ते, प्रवास भत्ता, विमा योजना इत्यादींचा लाभही मिळेल.

• अर्ज करण्याची पद्धत :

या भरतीसाठी केवळ ऑनलाईन अर्जच स्वीकारले जातील.

•Bank of India Bharti महत्त्वाच्या तारखा

•ऑनलाईन अर्ज सुरू:जाहीर केल्यापासून

•अंतिम तारीख : 30 नोव्हेंबर 2025

MAHA ARA Bharti 2025 ; कार्यालयीन सहाय्यक पदाच्या 06 जागांसाठी अर्ज सुरू

अधिकृत जाहिरात (PDF) व अर्जाची लिंक बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF काळजीपूर्वक वाचणे अत्यावश्यक आहे.

 

2025 मधील बँक ऑफ इंडिया भरती ही सरकारी बँकेत करिअर करण्याची उत्कृष्ट संधी आहे. तुम्हाला स्थिर नोकरी, आकर्षक वेतन, आणि देशभरात काम करण्याची संधी मिळू शकते. पात्र उमेदवारांनी उशीर न करता वेळेत अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी भेट द्या 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *