Diwali padva ka sajara karto
Diwali padva ka sajara karto पती-पत्नीच्या प्रेमाचा खास दिवस!

•दिवाळी पाडवा म्हणजे काय?
दिवाळी पाडवा, ज्याला बलीप्रतिपदा किंवा गोवर्धन पूजा असेही म्हणतात, हा दिवाळीचा चौथा दिवस आहे.
या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बळी याला पाताळात पाठवले, अशी कथा आहे.
हा दिवस धर्माचा अधर्मावर विजय आणि दान, भक्ती आणि सत्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

•वैवाहिक जीवनातील महत्त्व
महाराष्ट्रात दिवाळी पाडव्याला “दिवाळी पाडवा” किंवा “बलीपाडवा” असे म्हणतात.
हा दिवस स्त्री-पुरुषांच्या नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी –
पत्नी पतीला औक्षण करते.
पती पत्नीला भेटवस्तू देतो.
दोघे मिळून सुख, समृद्धी आणि एकमेकांवरील प्रेमाचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा करतात.
• धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व
काही भागात या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते.
भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गावकऱ्यांचे रक्षण केले, त्याच्या स्मरणार्थ गोवर्धन पूजा साजरा केला जातो.
दिवाळी पाडवा या दिवशी पुरण पोळी चा नैवेद्य करून पूजा केली जाते.
हिंदू धर्मामध्ये गाई ला पवित्र मानले जाते , या दिवशी गाईच्या शेणाच्या गौळणी घालून त्यांची पूजा केली जाते.
•पाडवा या दिवशीचे पारंपरिक रिवाज
घरासमोर सुंदर रांगोळ्या काढणे.
अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करणे.
गोवर्धन पूजा व बलीप्रतिपदा कथा ऐकणे.
नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याशी गोड पदार्थ आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करणे.
नवविवाहित जोडप्यांसाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो.

•दिवाळी पाढवा शुभेच्छा
आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस बलीराजाप्रमाणे उदार, प्रेमळ आणि समृद्ध होवो! दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेम, समृद्धी आणि सौख्याने भरलेला दिवाळी पाडवा तुमच्या आयुष्यात येवो. शुभेच्छा!
बलीप्रतिपदेच्या मंगल
प्रसंगी आपल्या संसारात आनंद, शांती आणि ऐश्वर्य नांदो.