Site icon Taaze Update

Maharashtra Vanvibhag Bharti 2025

Maharashtra Vanvibhag Bharti 2025 ; वनविभाग भरती

महाराष्ट्र शासनाच्या वनसंरक्षक (प्रादेशिक कार्यालय) नागपूर यांच्या अंतर्गत वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागात नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. Maharashtra Vanvibhag Bharti 2025 या भरतीअंतर्गत “विधी सल्लागार” (Legal Advisor) या पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती करार पद्धतीने (Contract Basis) होणार असून, नागपूर येथे काम करण्याची संधी उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता :

मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर व जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा विधी व न्याय विभागामधुन सेवानिवृत्त झालेले सहसचिव/उपसचिव/अवर सचिव या दर्जाचे अधिकारी या शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेले असावा.

 

वनविभाग भरती 2025 ऑनलाइन फॉर्म ची शेवटची तारीख :
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2025 आहे. उमेदवारांनी वेळ न घालवता फॉर्म भरून टाकावा.

एकूण जागा : आता फक्त 01 जागा शिल्लक आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण : नागपूर येथे आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर वनवृत्त, नागपूर, नवीन प्रशासकीय इमार शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल ,नागपुर-440 001.

state bank of india bharti 2025

भरतीविषयी काही अटी :
करार पद्धतीने नियुक्त होणारा सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.
संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी चालू नसावी किंवा प्रलंबित नसावी.
उमेदवारास वनविषयक, फौजदारी, दिवाणी, सेवा, आर्थिक व कामगार विषयक कायदे यांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे चांगले ज्ञान आवश्यक आहे.
संगणकाचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

Exit mobile version