Taaze Update

Latest marathi news

Bank of Baroda Bharti 2025
जॉब एज्युकेशन सरकारी योजना

Bank of Baroda Bharti 2025 ; 2700 नवीन जागांसाठी भरती सुरू

Bank of Baroda Bharti 2025 ; बँक ऑफ बडोदा कडून 2700 नवीन जागांसाठी भरती सुरू

भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीयकृत बँक म्हणून ओळखली जाणारी बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda bharati 2025)साठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 2700 मोकळ्या जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम आणि सुवर्णसंधी असून भारतातील सर्व राज्यांतील उमेदवारांना यातून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

 

•पदाचे नाव : शिकाऊ (apprentice)

 

• बँक ऑफ बडोदामध्ये शिकाऊ उमेदवाराची नोकरी म्हणजे काय?

पदाचे नाव शिकाऊ (Apprentice) असे असून हा एक वर्षाचा प्रशिक्षणाधारित कार्यक्रम असेल. भारतीय सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशिक्षण कालावधी, सुट्ट्या व कामाची परिस्थिती निश्चित करण्यात आली आहे.

 

• Bank of Baroda Bharti एकूण पदे : 2700 जागा.

• भरती प्रकार: सरकारी बँक भरती

• नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

• शैक्षणिक पात्रता :

या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. म्हणजेच Arts, Commerce, Science, Engineering किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील पदवी मान्य आहे.

महत्त्वाची अट:

उमेदवाराने यापूर्वी कोणत्याही संस्थेत अप्रेंटिसशिप प्रशिक्षण केलेले नसावे.

बँक ऑफ बडोदा किंवा इतर कोणत्याही सरकारी/खाजगी संस्थेत Apprentice म्हणून प्रशिक्षण घेतलेले उमेदवार पात्र ठरणार नाहीत.

पदवी पूर्ण केल्यानंतर  वर्ष किंवा त्याहून अधिक अनुभव असलेल्या उमेदवारांना Apprentice पदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

• वयोमर्यादा :

या भरतीसाठी 20 ते 28 वर्षे वयोमर्यादा लागू आहे. आरक्षणानुसार काही उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमाफ दिली जाऊ शकते.

Bank of Baroda Bharti 2025 अर्ज प्रक्रिया – Online पद्धत :

बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

• अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे :

शैक्षणिक प्रमाणपत्रे

ओळखपत्र (Aadhaar / PAN)

पासपोर्ट साईज फोटो

स्वाक्षरी

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

•Bank of Baroda Bharati साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025 आहे.

उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटच्या दिवसांत अनेकदा सर्व्हर स्लो होत असल्याने अर्ज वेळेत सादर करण्याचा सल्ला दिला जातो.

Bank of Baroda Bharti ही भारतातील पदवीधर तरुणांसाठी मोठी संधी आहे. सरकारी बँकेमध्ये अप्रेंटिसशिपद्वारे अनुभव मिळणे ही उज्वल करिअरची पहिली पायरी ठरू शकते. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी नक्कीच साधावी. भरतीची संपूर्ण जाहिरात, पात्रता नियम आणि ऑनलाईन अर्ज लिंक बँकेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत.

• बँक ऑफ बडोदा ही सरकारी नोकरी आहे का?

बँक ऑफ बडोदा ही बँक डायरेक्ट केंद्र सरकारची नोकरी नसून सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.

या बँकेचे मुख्यालय गुजरात मधील वडोदरा येथे आहे.

PDCC Bank Bharti 2025 ; पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 पदांची मोठी भरती

• एलबीओ बँक ऑफ बडोदासाठी पात्रता काय आहे?

उमेदवाराला कोणत्याही विद्यापीठातून

पदवीधर असावी. पण ते विद्यापीठ मान्यताप्राप्त असावे.

 

अधिक माहितीसाठी भेट द्या 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *