Site icon Taaze Update

MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 87 पदांसाठी भरती – ऑनलाईन अर्ज सुरू

MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 87 पदांसाठी भरती – ऑनलाईन अर्ज सुरू

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये शासकीय नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी संधी उपलब्ध झाली आहे. MPSC BHARTI 202 अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध संवर्गांतील एकूण 87 रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती सामान्य प्रशासन विभाग तसेच महसूल व वन विभाग अंतर्गत केली जाणार आहे.

 

सरकारी नोकरीची सुरक्षितता, स्थिरता आणि चांगल्या करिअर संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे. सदर भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली असून, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

 

भरती विभाग

 

महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)

 

भरती प्रकार

 

कायमस्वरूपी (Permanent) शासकीय नोकरी मिळवण्यासाठीची सुवर्णसंधी

 

एकूण रिक्त पदे

 

087 पदे

 

वयोमर्यादा

 

उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. शासन नियमांनुसार मागास प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत लागू होईल.

 

नोकरीचे ठिकाण

 

संपूर्ण महाराष्ट्र

 

अर्ज करण्याची पद्धत

 

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

 

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी असून, उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचणे अनिवार्य आहे.

 

पदांचे नाव व आवश्यक पात्रता

 

1) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ

 

या पदासाठी उमेदवाराकडे खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे:

 

सांविधिक विद्यापीठाची किमान 55% गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी, किंवा

चार्टर्ड अकाऊंटंट (CA) अंतिम परीक्षा उत्तीर्ण, किंवा

कॉस्ट अँड वर्क्स अकाऊंटंट (ICWA) अंतिम परीक्षा उत्तीर्ण, किंवा

वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी, किंवा

AICTE मान्यताप्राप्त संस्थेमधून MBA (Finance / Financial Management) पदव्युत्तर पदवी

 

2) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब

 

सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी किंवा

विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी

(स्थापत्य अभियांत्रिकी, वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषय वगळून)

 

3) पशुवैद्यकीय अधिकारी, गट-अ

 

पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन (B.V.Sc. & A.H.) पदवी

महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, 1971 अंतर्गत नोंदणी आवश्यक

मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य

 

पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले उमेदवार पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील. मात्र मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्यास विहित अंतिम दिनांकापर्यंत पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच आंतर्वासिता (Internship) किंवा प्रत्यक्ष कार्यानुभव आवश्यक असल्यास तो मुख्य परीक्षेच्या अर्जाच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केलेला असावा.

 

अर्ज शुल्क

 

आमागास प्रवर्ग: ₹544/-

आर्थिक दुर्बल घटक / दिव्यांग / मागास / अनाथ प्रवर्ग: ₹344/-

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख

 

20 जानेवारी 2026 रोजी रात्री 23:59 वाजेपर्यंत

 

 

MPSC BHARTI 2025 ही महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये उच्च दर्जाची शासकीय नोकरी मिळवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. चांगला पगार, शासकीय सेवा, सामाजिक प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये प्रगती यामुळे ही भरती आकर्षक ठरते. पात्र उमेदवारांनी वेळ न घालवता अधिकृत जाहिरात वाचून अंतिम तार

खेपूर्वी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

 

Exit mobile version