Punjab Bank Bharti 2025 जाहीर! तुमची निवड होऊ शकते या टिप्सने.
पंजाब बँकच्या ही भरती घेण्यात येत आहे. ह्या बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी माणसे खूप उत्सुक आहेत. नुकतीच PNB द्वारे 750 स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी नवीन Punjab Bank Bharti 2025 ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारी बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची ही अत्यंत उत्तम संधी आहे.
🔸पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी (LBO)
🔸मोकळ्या जागा: 750 जागा
🔸अर्ज करण्याची तारीख: 3 नोव्हेंबर 2025
🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2025
🔸वय वर्षे : 20 ते 30 वर्षे (१ जुलै २०२५ रोजी) असले पाहिजे.
🔸अर्ज शुल्क:
अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग उमेदवारांसाठी 59 रुपये आणि इतर सर्व उमेदवारांसाठी 1180 रुपये (जीएसटीसह)
🔸Punjab Bank Bharti 2025 निवड प्रक्रिया :
लेखी परिक्षा ही ऑनलाईन होईल. हे झाल्यानंतर मुलाखत होईल.
🔸परीक्षा तारीख : परीक्षा ही अंदाजे डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 ला होण्याची शक्यता आहे.
🔸 नोकरी कालावधी : ही नोकरी कायमस्वरूपी (parmanent)आहे.
🔸शैक्षणिक पात्रता :
या भरतीमध्ये सर्वात महत्त्वाची आणि उमेदवारांसाठी मोठी संधी म्हणजे फक्त पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात . कोणत्याही शाखेतून Graduation पूर्ण केलेले विद्यार्थी या पदासाठी पात्र आहेत.
तथापि, अधिक तपशीलवार शैक्षणिक अटी, आवश्यक प्रमाणपत्रे, अभ्यासक्रम इत्यादी बाबी जाणून घ्या. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती उपलब्ध आहे.
🔸पदाविषयी माहिती – Local Bank Officer (LBO) JMGS-I
स्थानिक बँक अधिकारी ही बँकेतील एक महत्त्वाची जबाबदारी असलेली पदवी आहे. LBO हा बँकेतील विविध लोकल ब्रँच ऑपरेशन्स, ग्राहक सेवा, कर्ज प्रक्रिया, खाते व्यवस्थापन, दस्तऐवज पडताळणी, व्यवहार नियंत्रण इत्यादी कामांची जबाबदारी सांभाळतो.
arogya vibhag bharti 2025
🔸ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असू शकतात:
आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र
पदवी प्रमाणपत्र / गुणपत्रिका
फोटो आणि सही
जात प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)
अपंगत्व प्रमाणपत्र (PWD उमेदवारांसाठी)
रहिवासी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
Punjab Bank Bharti 2025 ही बँकिंग क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्कृष्ट संधी आहे. कमी शैक्षणिक पात्रतेत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून, सरकारी नोकरीसह आकर्षक वेतन आणि प्रगतीची उत्तम संधी उपलब्ध आहे.
जर तुम्ही स्थिर, सुरक्षित आणि प्रतिष्ठेची सरकारी बँक नोकरी शोधत असाल, तर ही भरती तुमच्यासाठीच आहे. आजच अधिकृत जाहिरात वाचा आणि अर्ज प्रक्रिया सुरू करा!

